STORYMIRROR

Umesh Dhaske

Abstract

4  

Umesh Dhaske

Abstract

स्वरांजली

स्वरांजली

1 min
312

स्वरांचे विश्व आज

अंधार पांघरुन जणू बसले

कसे कुणास ठावूक  

आज विपरीत असे घडले ?


स्वरांवर प्रेम करणारी 

माऊलीच निःशब्द झाली

पांघरुन तिरंग्याचे घेऊन

स्वराई निजून गेली...!


पोरके करुन गेली स्वरांना

अबोल संगीत झाले

सूरांनाही आज अश्रू

आवरता आवरेनासे झाले....!


उन्मळून पडली आज

सूरांची मालिका

बेसूर झाले संगीत

उतरला गीतांचा साज...!


सहा दशकांची सूरबरसात

सार्‍यांनाच भिजवून गेली

स्मृती गीतांच्या अजरामर

जगी ठेवूनी गेली....!


नवे विश्व उभे राहिल पुन्हा

सूरही काही झळकतील पुन्हा

स्वरमात्र तो एकच असेल

आसंमती दुमदुमेल पुन्हा....!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract