स्वप्नरंग
स्वप्नरंग
सोनेरी आभाळाच्या धुंद
शुभ्र मऊशार महाली
स्वप्नरंग लोभस मोहक
रंगले तेथे कातरवेळी
हदयात हर्षलहरी नादावता
सप्तसुरात मल्हार शृंगारला
याद येताच सख्याची
तारकाही मुक्त विहारल्या
मनसोक्त जगले स्वप्नरंग लेवुनी
नभांगणी खुलली कोपरखळी
मनात मोगरा फुलला
त्या मोहक अधीर सांजवेळी
