स्वप्नातली परी
स्वप्नातली परी
पांढरे शुभ्र पंख पसरून
परी आली आमच्या अंगणात
डोक्यावर मोत्यांचा किरीट लावून
घातलाय तिने पांढरा फ्रॉक अंगात
नाचू लागली सुंदर स्वप्नातली परी
बिस्कीट नि गोळ्यांच्या गच्चीवर
केवढा फळांचा ढीग पडला दारी
परी मात्र बसली कापसाच्या खुर्चीवर
पशूपक्ष्यांशी मजेत खेळता खेळता
माझा सारा अभ्यासही तिने केला
जादूची कांडी फिरवून मात्र
अनाथाश्रमात केक, गुलाबजाम दिला
सगळीकडे आनंदी आनंदच झाला
आंब्याच्या झाडाला सोन्याची फुले
रंगीबेरंगी पंखांवर बसवून मला
थुईथुई नाचणारा मोर आनंदाने डुले
नंतर संगणक घेऊन परी आली
तिने शिकवणी माझी सुरू केली
तेव्हा माझी गणितात दांडी गुल झाली
मग स्पर्धेची तयारी करायची म्हणाली
परी म्हणाली हुश्श! बस्स जाते आता
अत्याचार, अंधश्रद्धा सहन होत नाही
जादूची कांडी कितीही वेळा फिरवली तरी
मुक्या कळ्यांची चिरफाड पाहवत नाही
