स्वप्नातील घर
स्वप्नातील घर
काल स्वप्नात बघितले एक सुंदर घर
घराच्या भिंती मला म्हणाल्या
बघ आम्ही कसं एकमेकांना जुळलेलो आहो म्हणूनच तर हे घर आहे....
तेवढ्यातच घराचे छप्पर हसलं अन्
म्हणाल मी आहे या घराचा मुख्य भाग जो सतत ऊन पावसाचा मारा सहन करतो
म्हणूनच तर हे घर आहे....
मग हळूच मंद हवेची झुळूक आली अन् मला घराच्या खिडकीजवळ घेऊन गेली
तेव्हा ती खिडकी म्हणाली बघितलंस ना हवेची
झुळूक अन् सूर्याचा प्रकाश मी तुला देते
म्हणूनच तर हे घर आहे....
तितक्यातच घराच्या दारावर असलेली घंटा वाजली
आणि मी वळले दाराकडे तेव्हा दार म्हणालं
माझ्यामुळे होतं घर तुझं पूर्ण घरात येणाऱ्या
प्रत्येकावर असतं लक्ष माझं संपूर्ण म्हणूनच तर हे घर आहे..
घराचा प्रत्येक भाग माझ्याशी बोलून
स्वतःचं महत्त्व सांगत होता
तेवढ्यातच हळूच माझे डोळे उघडले
आणि बघते तर काय घर होते ते स्वप्नातले.....
