STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract Inspirational Others

3  

Rohit Khamkar

Abstract Inspirational Others

स्वप्नासाठी

स्वप्नासाठी

1 min
212

काय जाणावे आयुष्य, या एका जन्मात.

लाखो विचारांची घालमेल, माझ्या या मनात.


बोलतील आपलेच सारे, जशी काळजीच ती त्यांना.

टोमन्याला उत्तर ही आता, कशी बोचतील यांना.


झालो नाही वश तरी, चालू साम दाम दंड भेद.

आपलीच माणसे आपल्यावरती उठली, हाच आहे खेद.


पाडण्यास दुसऱ्याला, स्वतः हरण्याची लाज नाई.

सुरवातच शर्यतीचा, लायकी दाखवन्यासाठी होई.


तरीही टिकतील, विचार विरोधाच्या लढाईत.

भलेही खूप उठाव मोडतील, विरोधी आहे सराईत.


हरलो नाही पण हरेलही, पण गमवायला काहीच नाही.

जिंकूनही तुम्ही, शेवटी मागे काहीच उरणार नाही.


नको मदत सहानुभूती की भीक, फक्त थोडा वेळ हवा आहे.

येणारा प्रत्येक दिवस, स्वप्नासाठी नवा आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract