STORYMIRROR

KUSUMANAND ANAND RAUT

Inspirational Others

4  

KUSUMANAND ANAND RAUT

Inspirational Others

" स्वप्न "

" स्वप्न "

1 min
421

" पुन्हा येतो मी नदीकाठी 

 ते अतुल्य स्वप्न वेचण्यासाठी 


 पुन्हा येतो  मी  नदीकाठी 

 ते अतुल्य स्वप्न वेचण्यासाठी 

 हरवत चाललेला  क्षण क्षण

मनात आत आत साठवण्यासाठी


पुन्हा येतो  मी नदीकाठी 

वाहून  गेलेल्या जनावरांसाठी 

हरवून दूरावलेल्या लेकरांसाठी

भिजून तुटलेल्या संसारासाठी 


नदी सांगते मला ठणकावून 

या स्वप्नात अडकू नकोस 

ते वाहू  इच्छितात 

त्यांना तू अडवू नकोस 


या अशा वाहण्यातही  

जगानिराळी  कथा  आहे

त्यात तुझ काहीच नाही  

हीच तुझी व्यथा आहे 


एक  स्वप्न  अपूर्ण  राहिल्याने 

जीवन  अधूर  राहत नसतं 

साचलेल कोणतही डबकं

कधी ही वाहत नसतं 


जे घडलं ते काल झालं 

आज सार नव्याने हातात आलं 

भूतकाळ जर विसरून जाल

तरच वर्तमान आनंदाने जगाल


नवी स्वप्न तुला पहावी  

लागतील या धन्य जीवनासाठी

दुःखी अतिसामान्य मनासाठी

पुन्हा येतो मी नदीकाठी 

नवी स्वप्ने पाहण्यासाठी 


पुन्हा  येतो  मी  नदीकाठी 

ते  अतुल्य  स्वप्न वेचण्यासाठी "



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational