बैलपोळा
बैलपोळा
बघा प्राण्यांनो आणि त्यांच्या मालकांनो
आला वर्षातून एक दिस मोठा
ठाकठीक होईल आमचा गोठा
जरा तुम्ही शांतता पाळा
उत्सव हा आपला मराठमोळा
सण आला बैलपोळा सण आला बैलपोळा
शेतकऱ्यांनो आमचं अंग
जरा नीट चोळा
तेलान एक दिवसच
खांदा ही नीट मळा
सण आला बैलपोळा सण आला बैलपोळा
आमच्या कष्टाचा अशान
होईल का हिशोब गोळा
नव्यानं कष्टण्यासाठीच
आम्हांला ओवाळा
उत्सव हा आपला मराठमोळा
सण आला बैलपोळा, सण आला बैलपोळा
ज्या खांद्यान अवजार
पेलली तोही चोळा
आजच्याच दिवशी आपली
कृतज्ञता ही पाळा
देवासारखी पुजा उरकली
की गळ्यात घाला माळा
उत्सव हा आपला मराठमोळा
सण आला बैलपोळा, सण आला बैलपोळा
अहो आमच्यामुळ कायम
पेटत राहील तुमची चुल
मेवापारखी घाला आम्हांला
रंगीबेरंगी झुल
उत्सव हा आपला मराठमोळा
सण आला बैलपोळा , सण आला बैलपोळा
सजवून धजवून मिरवणुकी पूर्वी
बांधा पायात चाळा
आमच्या अविरत कष्टासाठी
ही परंपरा पाळा
उत्सव हा आपला मराठमोळा
सण आला बैलपोळा
सण आला बैलपोळा ,सण आला बैलपोळा
