STORYMIRROR

KUSUMANAND ANAND RAUT

Abstract

4  

KUSUMANAND ANAND RAUT

Abstract

एक दिवस असा ही येईल

एक दिवस असा ही येईल

1 min
777


एक  दिवस  असा ही

येईल  या  आयुष्यात 

मी  'मि' असणार  नाही

तू  'तु'  असणार  नाही

कोणी  जिंकणार  नाही

कोणी  हरणार  नाही  || १ ||


एक  दिवस  असा ही

येईल  या  आयुष्यात

कोणी  जगणार  नाही

आणि  मरणार  नाही

मी  रडणार  नाही

तू  हसणार  नाही  || २ ||


एक  दिवस  असा ही

येईल  या  आयुष्यात

तू  बोलणार  नाही

मी  ऐकणार  नाही

कधी कोणी सांगणार नाही

आणि कधी मागणार नाही ||३||



एक  दिवस  असा ही

येईल  या  आयुष्यात

तुला  काही आठवणार  नाही

मला ती ही विसरणार  नाही

कोणी  जागणार  नाही

आणि जागवणार ही नाही ||४||



एक  दिवस  असा 

ही

येईल  या  आयुष्यात

मी  धरणार  नाही

तू काही  करणार नाही

कोणी  सोडणार  नाही

आणि  मोडणार  नाही ||५||



एक  दिवस  असा ही

येईल  या  आयुष्यात 

तू  भेटणार  नाही

मनात  काही पेटणार  नाही

कोणी  जोडणार  नाही

आणि मोडणार  नाही ||६ ||



एक  दिवस  असा ही

येईल  या  आयुष्यात

तुला  क्षण  सरणार नाही

मला  वन  उरणार  नाही

कोणी  तारणार  नाही

आणि मारणार  नाही ||७||



एक  दिवस  असा ही

येईल  या  आयुष्यात

कोणी  ही  नसणार 

वर्त , भूत  आणि भविष्यात

एक  दिवस  असा ही

येईल   या  आयुष्यात ||८||

              


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract