STORYMIRROR

KUSUMANAND ANAND RAUT

Others

4  

KUSUMANAND ANAND RAUT

Others

प्रेम आणि स्पर्श

प्रेम आणि स्पर्श

1 min
349

प्रेमाचा आणि स्पर्शाचा 

निराळाच  वर्म  आहे

स्पर्श  करता येतो

प्रेम जाणवते हेच याचे मर्म आहे


प्रेम आहे मनाच

तुच्छ  कारण तनाच

हिरव  होण वनाच 

भान नसण जनाच 


मनात आहे  भावना 

तनात  वसते  वासना 

तुज मानतो मी जीवना 

यासाठी आहे ही विवंचना 


मन  म्हणे हजारदा 

तुझ्याशी माझ  नात आहे

मनाच्या आधारेच  तुझ्या 

आठवणीतून जळते वात आहे  


तुझ प्रेमच माझ्या  

सुख दुःखात साथ आहे

अमरप्रेमाची आपल्या 

स्पर्शावरही मात आहे


प्रेम आहे हृदयाच 

हृदयाच्या तारेच 

प्रेम आहे जीवनाच 

अमृताच्या धारेच 


प्रेमाचा आणि स्पर्शाचा 

निराळाच  वर्म  आहे

स्पर्श  करता येतो

प्रेम जाणवते हेच याचे मर्म आहे



Rate this content
Log in