" कान्हा "
" कान्हा "
1 min
251
" घुमू दे कान्हा तूझी बासरी
बरसू दे पुन्हा मेघसरी
आस हीच रे मनमोहना आता
भिजू दे चिंब माझी ओसरी
रागावलेली ती अबोल राधा
होवू दे भिजून हसरी
भागवू कशी तहान ही कोरडी
हरवल्या आहेत या श्रावणसरी
मूकी हाक ऐक कृष्णा
राहू दे लेक सुखी सासरी
हे मोहना , कृष्ण मुरारी
तुझ्याविना आस नाही कुसुमानंदा दुसरी "
