उद्देश!
उद्देश!
1 min
524
कशासाठी जगतो आहोत आम्ही
याचा बोध झाला पाहिजे
सुखासाठी की दुःखासाठी
केवळ याचाच शोध घेतला पाहिजे
आपल्या सुखात दुसऱ्यांना
दुखावण कधीच नसाव
दुःखीना क्षणात सुखावण
यातच आपलं सुख असाव
हे शक्तीश्वरा तू तरी सांग
जगण्याचा काय अर्थ आहे
नाहीतर माझ्यासाठी
सगळं काही व्यर्थ आहे
का इतरांना सुखात हसवण
हेच जीवन सार्थ आहे
हाच जीवनाचा उद्देश
आणि परमार्थ आहे
कशासाठी जगतो आहोत आम्ही
याचा बोध झाला पाहिजे
सुखासाठी की दुःखासाठी
केवळ याचाच शोध घेतला पाहिजे
