STORYMIRROR

KUSUMANAND ANAND RAUT

Tragedy

4  

KUSUMANAND ANAND RAUT

Tragedy

पावसा तू आता पडलं पाहिजे

पावसा तू आता पडलं पाहिजे

1 min
299

पावसा तू आता खरंच

आम्हाला जगवण्यासाठी पडलं पाहिजे

हिरवे कोंब आणि मुकी सोंगं 

जगण्यासाठी बरंच रडलं पाहिजे !


तुला वाटतय का आमच्या 

आयुष्याचं गणित गडबडलं पाहिजे

काळ्या आईनं अन् माईनं

दरसालच तरफडलं पाहिजे


तुला कोणी सांगितलं 

सारखं - सारखं अस दडलं पाहिजे

पावसा तू आता खरंच

आम्हाला जगवण्यासाठी पडलं पाहिजे

हिरवे कोंब आणि मुकी सोंगं 

जगण्यासाठी बरंच रडलं पाहिजे!


तुझं असं अवकाळी येणं

मित्रा बघ सोडलं पाहिजे

जन्मोजन्मीच्या या नात्याचं देणंघेणं

भरभरून पडून तू जोडलं पाहिजे


ओली पिकं करपून चाललीत

त्यांना कुठं गाडलं पाहिजे

नाहीतर एकएक जनावरं शालीत

गुंडाळून तुझ्याकड धाडलं पाहिजे


पावसा तू आता खरंच

आम्हाला जगवण्यासाठी पडलं पाहिजे

हिरवे कोंब आणि मुकी सोंगं 

जगण्यासाठी बरंच रडलं पाहिजे 

ढसढसा रडलं पाहिजे !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy