STORYMIRROR

KUSUMANAND ANAND RAUT

Others

4  

KUSUMANAND ANAND RAUT

Others

दिव्या दिव्या

दिव्या दिव्या

1 min
200

दिव्या दिव्या

प्रकाश दे

अंधार नसलेल

आकाश दे..


दिव्या दिव्या

प्रेम सुख दे

प्रामाणिक कष्टाची

रखरखती भूक दे...


दिव्या दिव्या

यशाचा मार्ग दे

प्रत्येकालाच नवा

हवा तो स्वर्ग दे...


दिव्या दिव्या

मानवतेची क्रांती दे

जगाला आणि

मानवाला शांती दे...


दिव्या दिव्या

सद्सद विवेक बुद्धी दे

चुकलेल्यांना जरा

अजून एक शुद्धी दे...


दिव्या दिव्या

मांगल्याचे सण दे

दु:ख विसरून जगावे

म्हणून आनंदाचे क्षण दे...


दिव्या दिव्या

प्रकाश दे

अंधार नसलेल

आकाश दे..!


Rate this content
Log in