स्वप्न निवडुंगाच
स्वप्न निवडुंगाच
रखरखत्या उन्हामध्ये
उभ एक निवडुंग
स्वतःच्या अस्तित्वासाठी
सुरू त्याची झुंज...
उन्हामध्ये बहरून यावं
होती त्याची आस
वेगळंपण सिद्ध करावं
जणू त्याच्या ध्यास...
काटेरी अंग त्याच
दिसत होतं विद्रूप
इतर झाडे वेली सुद्धा
हसायची त्यावर खूप...
लक्ष दिलं नाही त्यान
कुणाच्या हसण्या कडे
ठाऊक होतं झुकतील सारी
त्याच्या जिद्दी पुढे...
सोकुन गेली झाडं वेली
गळून पडली फुलं
पाहू लागली निवडुंगाला
होतं तेजस्वी त्याच अंग...
बहरला होता निवडुंग
नाजूक अश्या फुलांनी
जिद्दी पुढं नशीब हरतं
केलं सिद्ध त्यानी...
