स्वातंत्र्याची पहाट
स्वातंत्र्याची पहाट


झाली स्वातंत्र्याची पहाट,
तुटली पारतंत्र्याची बेडी,
फोडू अन्यायाला वाचा,
उभारू माणुसकीची गुढी.
फडकवू तिरंगा डौलाने,
उर भरून येई हर्षाने,
घेऊ एकवचन एकमुखाने,
राहू सारे गुण्यागोविंदाने.
झगडले वीर या देशाचे,
देशासाठी अमर हुतात्मे झाले,
करावया पारतंत्र्यातून सुटका,
निधड्या छातीने सारे लढले.
झाली स्वातंत्र्याची पहाट,
क्रांतीज्योती तेवत ठेवू,
बलिदान करू सार्थक वीरांचे,
देशभक्तीची मशाल हाती घेवू.