स्वातंत्र्याची पहाट झाली...
स्वातंत्र्याची पहाट झाली...
पारतंत्र्याची संपवून गुलामी
अंधारातून नवतेजाने दिशा उजळली
उठा उठा रे नवयुवकांनो
स्वातंत्र्याची पहाट झाली...!
ध्वज तिरंगा फडकला आकाशी
पहा इंद्रधनूने कात टाकली
आनंदाने नटली सृष्टी सारी
स्वातंत्र्याची पहाट झाली...!
सुजलाम् सुफलाम् भारतमाता
चक्र प्रगतीचे घेऊन आली..
आत्मनिर्भरतेचे स्वप्न पाहुनी
स्वातंत्र्याची पहाट झाली...!
क्रांतिकारकांच्या असीम त्यागातून
देशभक्ती इथे मनामनांत रुजली
घेऊन आदर्श त्या देशप्रेमाचा
स्वातंत्र्याची पहाट झाली...!
देश अवघा संविधानाने घडला
कायद्याने सारी धोरणे सजली
न्याय,समता आणि बंधुत्वाने
स्वातंत्र्याची पहाट झाली....!
लोकशाही भारत देशाची
विश्वात शोभून राहिली
अमरत्वाचा जयघोष करुन
स्वातंत्र्याची पहाट झाली....!