स्वातंत्र्य दिन
स्वातंत्र्य दिन
"विजयी विश्व तिरंगा प्यारा
झेंडा उंचा रहे हमारा"
स्वर्गाहूनी प्रिय आमुचा सुंदर
भारत देश वाटतो आम्हाला
परंपरा उज्ज्वल आणि विविध किती
आम्ही सारे एक जरीही
विविध वेश अन् अनेक जाती जमाती
मातृभूमी ही अजिंक्य विश्वात
सार्या वंद्य संस्कृती
कणकण मातीचा बोले हर्षे
विश्वास प्रेम इथें नांदती
किती आक्रोश झाला
वाहल्या रक्तांच्या इथे नद्या
मातृभूमीला माता मानून तिच्या
रक्षणार्थ प्रखर राष्ट्रप्रेम मनी
ठेवून कित्येक
वीरांनी वीरमरण पत्करले
देशालाच आपला दागिना
मानून विवाहितेने
आपले सौभाग्य पणाला लावले
इच्छा-आकांक्षा दूर सारून
नाही जुमानला ऊन पाऊस वारा
वीर शिवाजी, प्रताप, बाजी थोर
आमचा इतिहास हा सारा
बलिदानाने त्यांच्या स्वातंत्र्यदिन
खरा उदयास आला
संपन्न इतिहास युवकात होती
प्रखर राष्ट्रप्रेम जागृती
कित्येक वर्षाच्या गुलामगिरी नंतर
स्वातंत्र्य सूय॔ उगवला
तिरंगा लाल किल्ल्यावर फडकला
दिन हा भाग्याचा स्वातंत्र्य दिनाचा
क्षण हा सौख्याचा
शान आमची तिरंगा गर्व असे आम्हाला
प्रिय आमचा राष्ट्रध्वज वंदनी असे आम्हाला
तीन रंग शोभे ध्वजाला
असाच फडकत राहो
तिरंगा उंच भिडे गगनाला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला
उत्सव तीन रंगाचा आभाळी आज
सजून धजून फळकत आहे
घरादाराची, कुटुंबाची, स्वतःची चिंता
न करता देशाचे रक्षण करीत सैनिक सीमेवर
आज उभे आहेत म्हणून आपण आरामात जगतो आहे
मातृभूमीच्या रक्षणार्थ झेलतात
ऊन पाऊस वारा त्यांच्यामुळेच
आहे आज सुरक्षित भारत देश सारा
