सुट्टी लागली हो
सुट्टी लागली हो
सुट्टी लागताच मला
खूप खूप आवडते
आता गावाला जायचे
मनी बेत रचायचे (1)
गावी जातो मामाकडे
दंगा मस्ती शेतामधे
मोटेवर पाण्यामधे
हवे तसे भिजायचे (2)
नदीवर पोहण्यात
येते लई भारी मजा
ढकलून दे पाण्यात
मग मिळे कशी सजा!! (3)
गोल भाकरीचा चंद्र
साथ झुणक्याची त्याला
तक्कू लोणचे रायते
असे तोंडी लावायला (4)
रात्री माळवदावर
गाण्यांसंगे गप्पागोष्टी
निळ्या आकाशात चंद्र
सवे चांदण्यांची दाटी (5)
सुट्टी संपताच माझे
डोळे भरुन यायचे
लवकर ये रे राजा
मामा मामी म्हणायचे (6)
