सुरक्षा
सुरक्षा


धास्ती लागली जगण्याची, दिवस सरते झाले
हतबल झाली जिंदगी, पोट पिळू लागले खळगे
महामारी की उपासमारी, पर्याय दोनच होते
हजारो किलोमीटर चालणाऱ्याच्या, मागे कोणीच उभे नव्हते
डोळ्यात पाणी पोटात भूक, नाचवत आहे चांगले
गर्दीची ती शहरे अनेक, बघता बघता पांगले
शत्रू उभा यत्र तत्र सर्वत्र, घालण्या पाही घाव
योग्य सामना करून, वाचवू सगळा मोडलेला डाव.
काळजी आधी स्वतःची करा, नंतर बाकी सर्व काही
तुम्ही सुरक्षित तर सर्व सुरक्षित, मग शत्रू लांब ऊभा राही