STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

सुपारी...!

सुपारी...!

1 min
29.5K



सुपारी सुपारी

प्रत्येक कामास

सुपारी


लग्नाची सुपारी

कार्यक्रमाची सुपारी

कार्याची सुपारी

कर्माची सुपारी

वर्माची सुपारी

मर्माची सुपारी

प्रारंभाची सुपारी

आरंभाची सुपारी


प्रत्येक वेळी सुपारी

राम बाण सुपारी

प्रत्येक संकटास उपाय

संकट हारी सुपारी

पुजावी सुपारी


कार्य सफल

होण्या लागी

असे ईश्वराची

त्या सुपारित भागी

भर दुपारी दुपारी

तोही भोजना

नंतर मागे

सुपारी सुपारी


हवी तर घ्यावी

एकदा प्रचिती

प्रार्थना करून

पुजावी सुपारी


श्रद्धा अंधश्रद्धा

बाजूस सारावी

गरजे पोटी

सुपारीस त्या

आपली म्हणावी

सारी कहाणी

तिला सांगावी

तिच्या कडे

एकदा यशाची मागणी करावी

श्रध्येची प्रसंगी कास धरावी

मनो भावे तिला

एकदा प्रार्थना करावी


कार्य सफल होता

कृष्णार्पण म्हणावे

कृतज्ञ राहुनी

आभार मानूनी

सुपरिस त्या अलगद

जलप्रवाही सोडावे

अन निश्चिन्त होउनी

आनंदी जीवन जगावे


ज्याचे त्याचे भाग्य

मला वाटते ती जाणी

कर्ता करविता भगवंत

समर्थ असतो चक्रपाणी

अशी ही सुपारी

बहु गुणकारी

कनवटीशी असावी

सदोदित कार्यालागी...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational