सुंदर शर्वरी
सुंदर शर्वरी
अंबरीची सांज
अवनी वरती
संधीचा प्रकाश
पसरे भोवती. १.
अस्ताला भास्कर
गोधने निघती
पक्षी घरट्यात
राऊळी सजती. २.
जीव थकलेला
असे दिनरात
चाहूल निशेची
प्रहर डोळ्यात. ३.
शांत परिसर
काळोख दाटला
नभीच्या प्रांगणी
तारा उगवला ४.
गंधाळला गंध
मंद रातराणी
बहर फुलला
मनाच्या कोंदणी. ५.
शरण देवीला
कुशीत घ्यायला
करुनी प्रार्थना
आर्जवे तिजला ६.
