सुख व समाधान
सुख व समाधान
शुद्ध अचार विचार
योग्य वागण्याचे भान।
व्यक्तीमत्व विचारात
सुख शांती समाधान॥१॥
वैचारिक देवघेव
सारं मनाच्या आधिन।
रागलोभ प्रमाणात
करा संयमा स्वाधिन॥२॥
प्रश्न मनात घोळतो
सुख कशात आसते।
मने जाणुन घेताच
सारं आंतरी दिसते ॥३॥
शांती सोबत असता
क्रोधा रागास गिळते।
मनोमन आपूलकी
मात्र मनास मिळते॥४॥
समाधान मिळवण्या
नको कशाचीच हाव।
सुख शांतीला जपावे
नको व्यर्थ धावाधाव॥५॥
