STORYMIRROR

कवी सुभद्रासुत- सं.बा.आंधळे

Others

4  

कवी सुभद्रासुत- सं.बा.आंधळे

Others

वंचितांची दीपावली

वंचितांची दीपावली

1 min
394

दीपावली वंचितांची

कधी आनंदी नसते ।

फक्त पोटाची खळगी

रोज भरत असते ॥१॥


सोंगढोंग मौजमज्जा

नाही त्यांच्या नशिबात ।

अन्न पोटाला आधार

उभं आयुष्य कष्टात ॥२॥


दीन दारिद्र्याची व्यथा

कुणा कधी सांगणार ।

वेळ काळ निभावती

नाही कुणाचा आधार ॥३॥


दुःख दारीद्र्य अंधार

रोज गरीब घरात ।

देह धुपत जळतो

वात पेटते उरात ॥४॥


दृष्टी वास्तव हेरावे

असे घटक वंचित ।

दाता वृत्तीने खोडावे

त्यांचे भविष्य संचित॥५॥


फटाक्याचा व्यर्थ खर्च

मोठ्या मनाने टाळावा ।

गरीबांच्या मदतीला

हात सढळ करावा ॥६॥


Rate this content
Log in