भाषा माझी मराठी
भाषा माझी मराठी
जन्मा आलीया मराठी
भाषा संस्कृतच्या पोटी।
मुख तहान भागवी
जशी शुद्ध जलतोटी
महाराष्र्ट संत भुमी
अद्य ग्रथ ज्ञानेश्वरी।
संत साहित्यिक खुश
मराठीच्या शब्दावरी॥२॥
बोलीभाषा सर्वतोंडी
मुखी रुळली मराठी।
अर्थबोध रसाळसा
सोपी ती बोलण्यासाठी॥३॥
गोड मवाळ मधाळ
भाषा साहित्य शोधक।
भाषा अभ्यास मराठी
साध्य संस्कारा बोधक॥४॥
भाषा हासरी लाजरी
तीत विनोदाची दाटी।
दोन अर्थाची किमया
नाट्य प्रेक्षकांच्यासाठी॥५॥
गीत ओवी मराठीत
सर्व लेखन वाचन।
ज्ञान अभ्यास मराठी
याने सुलभ चिंतन ॥६॥
भाषा शब्दाने सुरेल
अभंगाच्या गाण्यासाठी।
भक्ती शक्ती गती दिशा
भाषा महाराष्र्टासाठी॥७॥
