पहिला पाऊस
पहिला पाऊस
1 min
150
येतो पहीला पाऊस
सुटे सुगंध मातीचा।
नभ तापल्या भुईशी
हाची सुकाळ भेटीचा॥१॥
डरकाळी आकाशाची
सडा सर्वत्र थेंबांचा।
मधेमधे चमकतो
लख्ख प्रकाश विजांचा ॥२॥
पाणी चिखल सर्वत्र
बीजां पर्वणी कोमाची।
भुई मातीस ओलावा
अशा बीज उगण्याची ॥३॥
नदीनाले वाट पाहे
स्वच्छ निर्झर पाण्याची।
शेतकरी सुखावतो
चिंता नाहीशी शेतीची ॥४॥
मोठा आशेचा किरण
ऋतू पहिला पाऊस।
निसर्गाची तळमळ
वर्षा उमेदीची हौस॥५॥
