फटाकेमुक्त दीपावली
फटाकेमुक्त दीपावली
1 min
378
आली आली दीपावली
जपा निसर्ग झाडांना।
स्वच्छ रांगोळी अंगणी
मुक्ती द्यावी फटाक्यांना॥१॥
प्रदूषण टाळण्याचा
करा संकल्प मनात।
पाणवायू रक्षणार्थ
घ्या निर्णय क्षणात॥२॥
नासधूस धनलक्ष्मी
होतो दारात कचरा।
दुरदृष्टी अभ्यासता
घर कानाला हादरा॥३॥
छंद आनंद पाहता
देतो विषाची परीक्षा।
दमा आजार जडता
मग आयुष्याची भिक्षा॥४॥
जपा आपलं भविष्य
मार्ग सुचवा पिढीला।
सण वर्षाचा दिवाळी
ठेवा जाणीव घडीला॥५॥
