STORYMIRROR

कवी सुभद्रासुत- सं.बा.आंधळे

Others

3  

कवी सुभद्रासुत- सं.बा.आंधळे

Others

#भाषा मराठी गौरव

#भाषा मराठी गौरव

1 min
166

भाग्य लाभले आम्हास

भाषा   बोलणे मराठी ।

शब्द   रसाळ मार्मिक

मुखी   संभाषणासाठी ॥१॥


माय संस्कृतच्या पोटी

भाषा गोंडस जन्मली ।

छान   रसाळ उच्चार

शब्द चटक   लागली ॥२॥


शिरवाडकर    वि.वा.

बंधू    कुसुम  अग्रज ।

मराठीचे     शिलेदार

कवी अभ्यासू दिग्गज ॥३॥


काव्य कथा  कादंबरी

फार  ताकदी लिखाण ।

हाच   गौरव   भाषेचा

शब्द साहित्याची खाण ॥४॥


जन्मतिथी  शुभदिन

सत्तावीस   फेब्रूवारी ।

कवी विष्णू जन्मयोग

भाषा मराठीची वारी ॥५॥


माय मराठी रसिका

भाषा संवर्धन  दिन ।

प्रथा पद्धत वार्षिक

मातृ सेवक स्वाधिन ॥६॥


Rate this content
Log in