STORYMIRROR

कवी सुभद्रासुत- सं.बा.आंधळे

Others

3  

कवी सुभद्रासुत- सं.बा.आंधळे

Others

भाषा मराठी

भाषा मराठी

1 min
141

लावी वळण मराठी,

साहित्य लिहण्यासाठी।

स्वर सामर्थ्य मराठी,

किर्तन भजनासाठी॥१॥


भाव प्रेमळ मराठी,

गोडवा रसाळ ओठी।

ठाव रगींन मराठी,

प्रसिध्द लावणीसाठी॥२॥


रंगढंगीन मराठी,

हसर्‍या प्रेक्षकांसाठी।

दोन आर्थाची मराठी,

विनोद साधण्यासाठी॥३॥


अशी मधाळ मराठी,

भावगीत गाण्यासाठी।

स्वरबध्द हि मराठी,

ऐकणार्‍या कानांसाठी॥४॥


जन्म भाषेचा मराठी,

जेष्ठ संस्कृतच्या पोटी।

माय लाभली मराठी,

बोध विचारांच्यासाठी॥५॥


बोली भावूक मराठी

मन व्यक्त होण्यासाठी

भाषा लाडकी मराठी

सार्‍या महाराष्र्टासाठी॥६॥


Rate this content
Log in