STORYMIRROR

कवी सुभद्रासुत- सं.बा.आंधळे

Others

2  

कवी सुभद्रासुत- सं.बा.आंधळे

Others

शेतकरी

शेतकरी

1 min
43

शेतकरी राजा माझा 

नेत्रा मळकट दिसतो

असा जगाचा पोशिंदा

रोज शेतात कसतो॥१॥


पाच दहा किलोतुन

पिकवीतो खंडीभर।

अन्नधान्य पिकविण्या

रातदिन मरमर॥२॥


कधी दुष्काळ सामना

पिकवरी रोगराई।

त्याच हलाल जीवन

घेतलेल्या कर्जापाई॥३॥


बाजी लावतो शेतात 

अर्धांगीनी सोबतीला।

फार खर्च पिकासाठी

मशागत मजूरीला॥४॥


पिक येतं शेतातलं

भाव मोजका मालाला।

कर्ज खर्च फिटण्याची

चिंता त्याच्याच जीवाला ॥५॥


Rate this content
Log in