शुभ दीपावली
शुभ दीपावली
1 min
370
"वसु बारस" मुहूर्ता
गाय वासरु पुजती।
त्यांच्यातली उदारता
मन आत्मास दावती॥१॥
"धनत्रयोदशी" तिथी
धन्वंतरी वैद्यकांची।
पुजाआर्चा मनोभावे
आशा सुखी जीवनाची॥२॥ब
"नरकचतुर्दशीचे"
व्हावे हातून सत्कर्म।
अपप्रवृतीचा नाश
जपु सत्यवाद मर्म॥३॥
वसा "लक्ष्मीपुजनाचा"
धार्मिकता परंपरा।
सुखशांती सदा लाभ
हीच बरकत घरा॥४॥
"बलिप्रतिपदा" योग
असा आनंदी पाडवा।
बळीराजा सुखीभव
भाव आपेक्षा गोडवा॥५॥
"भाऊबीज" ओवाळणी
भाऊ बहिण सन्मान।
बंध दोनही नात्याचा
टिकणारा घट्ट छान॥६॥
