वसंताचा डामडौल
वसंताचा डामडौल
1 min
158
ऋतू वैभव वसंत
कर्ताधर्ता निसर्गाचा।
अवतार बदलतो
ऋतू पालक वृक्षाचा॥१॥
ऋतू निसर्ग नियम
शिशीरात पाणगळ।
देठ सुकतो पानांचा
झाडाखाली झाके तळ॥२॥
चैत्र मासाचा आरंभ
फुटे झाडास पालवी।
ऋतू वसंत येताच
फांदी झाडाची हिरवी॥३॥
फांदी वाकते ओझ्यांनी
येतो फुलांचा बहर।
फळ देणार्या झाडाला
फांदी शेंड्यात मोहर॥४॥
झोत अवकाळी हवा
फळं मोहर पडती।
पक्षासाठी अन्नदान
पक्षी वृक्षात खेळती॥५॥
