सुख-दुःखाचं रहाट (चक्र)
सुख-दुःखाचं रहाट (चक्र)


सुख काय असतं!
दुःख काय असतं!
संसाराचा रथ ओढणारा पार्थी असतो तो
दुःखाचं ओझं पेलवणारा गडी असतो तो
सुखासाठी रात्रंदिवस राबत असतो
विश्वास आणि प्रामाणिकपणा जपतो
अंगात थिगळ लावलेले कपडे घालून
शेतात राबत असतो तो।
अनवाणी पायाने काट्यांचा रस्ता तुडवत
दुःखावर पांघरून घालत असतो तेव्हा,
तो दुःख विसरून जातो, सुख दुसर्याला
वाटतो, दुःख गिळून घेतो तो।
माणूस म्हणून माणुसकी जपतो
सुख-दुःखाचं रहाट मेहनतीने ओढत असतो।