STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

सुजलाम - सुफलाम भारत घडवू ..

सुजलाम - सुफलाम भारत घडवू ..

1 min
30K


वृक्ष देतात शीतल छाया ...

नदी आपली तृष्णा भागवते

धरती आपुली भूक शमविते ...

विसरू नका रे आभाळमाया


मूठभर पेरावं अन पसाभर घ्यावं ...

दानत असते फक्त एवढी मातीचीच

ताई ,दादा चला गड्यानो ! लिहतं होऊ ...

आन हाय तुम्हाला मातेची आन मातीची ..


चला गड्यानो ! पेरणीलायक जमीन बनवू

घेतील पीक तेच आनंदाने ... जे पेरतील ..

तरारून येईल पीक तेव्हा आपण नसणार परंतु

आपणच होऊ त्यांच्यासाठी सदैव प्रेरणादायी ...


झाडे लावू ,झाडे वाढवू . इतिहास घडवू

प्रदूषण रोखू , वृक्षतोड थांबवू ...

स्वछतेचा मूलमंत्र जागवू मना -मनात

सुजलाम - सुफलाम भारत घडवू ..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational