STORYMIRROR

Bipin More

Abstract

4  

Bipin More

Abstract

सत्य

सत्य

1 min
398

खोलवर कोंडून ठेवलेल्या राकट जखमांना

अंधारात सुद्धा बाहेर पडता येत नाही

सर्वच कोलमडून जाईल ह्या भीतीनं

ठरवूनही उजेडात..मोकळं बसता येत नाही


भक्कम गड केला जरी अभिमानाचे दगड लावून

तरी किंचितश्या ओलाव्याने ते ही सरू लागतात

ओळखीच्या अस्त्राने मग गाभारा पोखरला जातो

ज्याला जे हव तो तेच पेरून निघून जातो


तिथल्या त्या थंड स्वातंत्र्यात मग मनं स्वार्थी होतं

कुणाच्या तरी पायावरून आपणही वाहून जावसं वाटत

मिळालेल्या थेंबभर आयुष्याचा ते साथ घेतं

आणि आकाशाच्या पोकळीत एक झाड असंही उभं होतं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract