स्त्रीशक्ती... नारीशक्ती
स्त्रीशक्ती... नारीशक्ती
अष्टभुजा, लक्ष्मी तू सावित्री अन् जिजाऊ
रूपे तुझे अनंत आज नव्यानेच आठवू
वसा थोर मातांचा मनात साठवू
स्त्रीशक्तीचा जागर आता जागवू
तू विनिता,कल्पना,सानिया अन सिंधू
मैदान गाजवी न तू फक्त नववधू
विसर तू आता फक्त उष्टी काढू अन् रांधू
घर अन नोकरी याचा समवाय साधू
तू हो पुढे,घे भरारी कर शांततापूर्ण क्रांती
समर्पित भावना जप तू ती समाधान वृत्ती
अगम्य विश्वास घे बळ लढावयास शक्ती
अनेक तुझी रुपे करूया भक्ती
नव सृजन माता रूप विराट तुझे ग नारी
मुक्त कर बंध,तोड पाश घे भरारी
नवपिढी घडवी जा तू क्षितिजावरी
नवरूपे करती अंधकार दूर सारी...