स्त्री कर्तृत्वाची खाण
स्त्री कर्तृत्वाची खाण
तूच रूक्मिणी तूच सीता
जिजाऊ अहिल्या समाण
नारी नाही कमजोर येथे
सांगे इतिहासाचे पान पान..!
प्रतिभा इंदिरा सर्वोच्चपदी
समाज सुधारक मदर तेरेसा
दाव तू तूझ्या कर्तृत्वाने
समाजास नवा आरसा..!
तुझी जिद्द आणि चिकाटी
तुझ्या भविष्या देई आकार
उंच भरारी घेऊन नभी
स्वप्ने तुझी तू कर साकार..!
तुझ्यात नव देवतांचे रूपे
तूच माता भगिनी साजरी
जगाची तूच जननी माते
दाव रूपे कठोर लाजरी..!
खूप काही करू शकते तू
जगू शकते अभिमानाने
ठेव अस्तित्वाची जाणीव
जगात जग तू सन्मानाने..!
नारी शक्तीचा जागर व्हावा
अन्यायाला जाळत न्यावा
एक दुजीला आधार देऊन
अत्याचाराला समाचार द्यावा..!
