STORYMIRROR

Chandan Dhumane

Inspirational Others

4  

Chandan Dhumane

Inspirational Others

स्त्री जन्माचा करा स्विकार

स्त्री जन्माचा करा स्विकार

1 min
223

स्त्री जन्माचा करा स्विकार

ती आहे सर्वांचाच आधार,

तिजवाचून नाही आपले जीवन

प्रत्येक जीवांची तीच शिल्पकार....


त्यागाची ही निस्वार्थी मूर्ती 

भगवंताची अद्वितीय निर्मिती,

तीच जगदंबा आदिशक्ती

तीच शारदा, तीच सरस्वती....


प्रेमस्वरूप वात्सल्यसिंधू

आई बापाची गुणवान लेक,

नाव करील मोठे जगात

असे करील पराक्रम अनेक....


अद्वितीय शक्ती आहे ती

तीच आहे ईश्वरी वरदान,

हवा पाठीवर प्रेमळ हात

करू नका तिचा अपमान....


मारू नका, खेचू नका 

ओढू नका रे तिचे पाय,

घेऊ द्या भरारी तिलाही

तीच आहे सर्वांची माय....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational