स्थिरता हवी
स्थिरता हवी
काजळा ने काय सांगावे कशाने .
साजणे स्वप्नात रंगावे कशाने.
उर्वशी ने साज केला सांज वेळी
साज होता ध्यान भंगावे कशाने
शायरीला साथ नाही लेखणीची
कागदावं अंतरे ल्ह्यावे कशाने.
छाटली ती प्रीत पीसं पिंजऱ्याने.
पाखराला पंख ते यावे कशाने.
नाचणाऱ्या या जगाला धीर नाही
नाद ब्राम्ही संथ ते गावे कशाने
