सशक्त नारी
सशक्त नारी
चूल अन् मूल सरला आता काळ
घेतली हाती तिने निश्चयाची ढाल!!
लाख संकटे उभी अडविण्या दारी,
घेण्या गगन भरारी सज्ज असे नारी!!
उंबरठ्याबाहेरी टाकले पहिले पाऊल,
पायांना झाली बोचऱ्या काट्यांची चाहूल!!
नात्यांचे पाश खेचती तिजला मागे,
परि दृढ होत गेले निश्चयाचे धागे!!
खडतर मार्गावरी चालू झाला प्रवास,
अन् मनी वाढू लागला यशाचा हव्यास!!
झेलूनी वार नित्य तुडवी काटेरी वाट,
दृढ इच्छाशक्तीचा रचे उच्च घाट!!
कष्ट, यश, अपयश रोज हितगुज करी,
दृढ निश्चयाची कास ती मुठीत घट्ट धरी!!
पाहूनी सशक्त नारी यशा येऊ लागली नमी,
चेहऱ्यावरील हास्यात झळके गोड यशाची ऊर्मी!!