रंगला रंगोत्सव!!
रंगला रंगोत्सव!!
1 min
316
निळ्या आसमंती आज
मेघ अनोखे दाटले,
नाही श्रावणाची सर
परि इंद्रधनू उमटले!!
साज रंगांचा कमानी
आसमंत खुलविते,
रंगपुष्पांचा तो सडा
वसुंधरा सजविते!!
रंग रंगात दडली
अनोखी एक खुबी,
रंगी न्हाली कोमल कांती
गाली हास्याची छबी!!
रंग पेरूनी अंगणी
प्रेमगंध तो माळिला,
रंगली गोरी राधा
अन् शामसुंदर सावळा!!
सान थोर सारे दंग
मनी मयूर नाचला,
हर्ष गगनी मावेना
उत्सव रंगांत रंगला!!