Ranjita Rewale

Romance


4.3  

Ranjita Rewale

Romance


🍁उधाण प्रित🍁

🍁उधाण प्रित🍁

1 min 333 1 min 333

अथांग गोड प्रित तुझी

लेखणीत माझ्या मावेना, 

कैद ह्रदयी गुज प्रितीचे

तू हळूच कानी सांग ना!! 


अबोल प्रित शोभे जरी

प्रेम भावना येऊ दे ओठी, 

सप्तजन्माचे नाते आपुले

घट्ट करू या रेशीमगाठी!! 


पावलोपावली प्रेम पुष्पे

दरवळे मनी प्रित गंध, 

लहरूनी प्रित लाटांवरी

होतसे मी तुझ्यात धुंद!! 


प्रेम जाळी गुंतलेले

तुज प्रितीचे रंगीन कोडे, 

उलगडण्याचा व्यर्थ सायास

बावरे मन ठरते वेडे!! 


बेधुंद प्रितीचे मधुर गाणे

नित्य मम ह्रदयी वाजे, 

उधाणलेल्या प्रितीत तुझ्या

लेखणीही माझी चिंब भिजे!! 


Rate this content
Log in

More marathi poem from Ranjita Rewale

Similar marathi poem from Romance