भाव मनीचे..सौंदर्य कवितेचे
भाव मनीचे..सौंदर्य कवितेचे
1 min
214
शब्द शब्दांची फुले
वेची शब्द फुले,
शब्दांच्याच फुला
शब्दांचेच झुले!!
शब्द शब्दांची गुंफण
करी शब्द गुंफण,
शब्दांच्याच गुंफणा
शब्दांचेच कुंपण!!
शब्दी शब्दांचाच रंग
उधळे शब्द रंग,
शब्दांच्याच रंगी
शब्दांचेच तरंग!!
शब्दी शब्दांचाच गंध
पसरवी शब्द गंध,
शब्दांच्याच गंधी
दरवळे आसमंत!!
शब्द शब्दांत दाटती
भाव मज मनीचे,
खुले मग सौंदर्य
माझ्या कवितेचे!!