Revolutionize India's governance. Click now to secure 'Factory Resets of Governance Rules'—A business plan for a healthy and robust democracy, with a potential to reduce taxes.
Revolutionize India's governance. Click now to secure 'Factory Resets of Governance Rules'—A business plan for a healthy and robust democracy, with a potential to reduce taxes.

Navya Gothal

Others

4.5  

Navya Gothal

Others

💦पाऊस💦

💦पाऊस💦

2 mins
433


कांतीवरी सताड भेगा घेऊनी पडली होती

व्याकूळ भूमी मेघराजा साद घालीत होती, 

अवचित पवने आसमंत धुळवड खेळले होते

टपोरे थेंब पावसाचे भूमीने प्यायले होते, 

ममतेचा तो वेडाळ गंध मनी दरवळला होता

सुखावणारा पहिला पाऊस मी अनुभवला होता!! 


इवले बीज घेऊनी उदरी माय निजली होती

रिमझिम वर्षा सर अलगेच तिज कुरवाळत होती, 

मेघा पायी कोंब कोवळे नम्र जाहले होते

हिरव्या शालूत माळरानही खुदकन हसले होते, 

गोंडस रानफुलांचा थाट निसर्ग मिरवीत होता

नवसंजीवनीचा प्याला पाऊस मी अनुभवला होता!! 


खडकांनाही फोडूनी पाझर दुग्ध झरे धबधबले होते

कोरड्या नदीतून अश्व जलाचे दुथड धावले होते, 

हिरव्या छबीत इवले मोती सुंदर सजले होते

जलमयी दर्पणी रूप पाहूनी रान लाजले होते, 

सौंदर्याची मोहक पुतळी स्वच्छंदी मढवित होता

मनमोहक चित्रकार पाऊस मी अनुभवला होता!! 


चिमुकल्यांचा धरूनी संग धूम ठोकली होती

इवल्या डबकी होडी कागदी सुरेख तरली होती, 

तरुणाई मनसोक्त वर्षावी मुक्त नाचली होती

गरमागरम चव निराळी जीभेवर थिजली होती, 

वृद्धाप्याचे हरपूनी भान मनी मोर नाचला होता

हास्यकळी खुलविता पाऊस मी अनुभवला होता!! 


कळले नाही अवचित त्यासी काय जाहले होते

ढगांचे ढगांशी भांडण कट्टर जुंपले होते, 

आसमंत दुभांगूनी वीजही साथीस होती

पाहूनी सारे वर्षा राणी अश्रू गाळीत होती, 

मोडून, पाडून, नेऊनी सारे दडून बसला होता

रडूनी रडविणारा पाऊस मी अनुभवला होता!! 


थाट तयाचा सांगावा काय स्वराज्य आले होते

रोमरोमांत घेऊनी स्फूर्ती सणही रंगले होते, 

सुखाची ती सर श्रावणी दारी रांगोळी सजवित होती

पुष्पवेलीची नाजूक कमान अंगण डोलवित होती, 

आनंदाचा तृप्त निर्झर तनमन गोठवित होता

गार असूनी ऊबदार पाऊस मी अनुभवला होता!! 


सुवर्णाने मढवित कांती तोऱ्यात चालला होता

सप्तरंगाची उधळीत फुले नभात झुलला होता, 

लहान थोरा करूनी दंग मग अश्रू गाळले होते

परतावयाचे दु:ख सांगाया बोल मूक जाहले होते, 

नव्या भेटीच्या ओढीने त्यासी हसत निरोप दिधला होता

अस्तित्व जयाचे अमृतमयी तो पाऊस मी अनुभवला होता!! 


Rate this content
Log in