साथी
साथी
उदास या जीवनी एक आशेचा किरण,
देऊनिया गेला मनी स्वप्न जगाया स्फुरण!!
स्वप्न नगरीची छाया मना लागली भुलवू,
कल्पना रम्य जग मज लागले झुलवू!!
एकली जरी दिसे परि नसे मी एकटी,
साथ देण्या मज झाली मनी शब्दांची दाटी!!
शब्द शब्दांत गुंफूनी खुलू लागले सौंदर्य,
रूप दिसे माझे गोड हे शब्दांचे औदार्य!!
सापडले मज जगी अनमोल असे साथी,
नटविले मन माझे अशी गोड त्यांची प्रिती!!
गुणगान त्यांचे गाया हाती घेते मी लेखणी,
गेली शब्दांत रमूनी माझी कविता देखणी!!