सर्वेष
सर्वेष
आयुष्याच्या या तुफानानं, थांबावं जरा.
बोलावं मला पहावं मला, आणि ऐकावं जरा.
माझ्यातला मी आणि, मी पणातलं माझ पण.
सगळं ठेंगणं जाणवतय, तिथं मोठा वाटतोय क्षण.
आनंदापुढं छोटी आहे, अहंकारी आयुष्याची लायकी.
मी पणाचा कळस बुडाला, लाचार जगण्याची किंमत पावकी.
कित्येक झाले कित्येक होतील, पण नाव गाव पत्ता पसार.
आयुष्याच्या हाताला काकण भरण्या, सुख दुःखाचा कासार.
अहंकार दाखवण्या गेलं सार आयुष्य, पण खरी ओळख झालीच नाई.
जितेपणी लाखोंची वर्दळ, अंत्ययात्रेला चौघांची घाई.
शेवटी सगळ्यांसारखंच झालं, काही असं नव्हतं विशेष.
सोडुनी सगळं इथेच गेला, जे वाटत होतं सर्वेष.
