सर्व धर्म समभाव
सर्व धर्म समभाव
एक धर्म एक जात
मानुसकीचा पढवा पाठ
सार्यांना घेऊन सोबत
संस्कारांची धरावी वाट॥१॥
समाज परिवर्तनाची
धरावी सदा कास
नव्या विचारांचे स्वागत
करावे सदा खास ॥२॥
आयुष्याच्या पायरीवर
कृतज्ञतेची जान ठेवा
कष्टणार्या हातांचा
आठवणीने मान ठेवा॥३॥
बनावे हितचिंतक
आब राखत लहानथोरांचा
परिस्थितीशी करत सामना
उचलावा वाटा मदतीचा ॥४॥
विश्वासाची पांघरून चादर
जपावे नाते कर्तृत्वाचे
समभाव जागृत ठेवून
ॠण फेडावे जगाचे॥५॥
