STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract Classics Others

2  

Manisha Awekar

Abstract Classics Others

सरत्या वर्षाला निरोप

सरत्या वर्षाला निरोप

1 min
121

पाणावलेल्या लोचनांनी त्याने

नाराजीने केले मला बाय बाय

मी म्हणाले अरे सरत्या वर्षा ,

कशासाठी खातोस एवढी तू हाय?


बोलायचंय तुझ्याशी जरा थांब

संकटातच माणूस शिकतो छान

आपल्या परक्यांची दिलीस जाण

संकटातच जवळ येणारा महान


दानशूरांचे आदर्श दाखवलेस

मानवता धर्माचे महत्व सांगितलेस

गृहिणींना मोठ्या मनाने दिलासे दिलेस 

मदतीला तिच्या सा-यांना धाडलेस


बाई गुरुजींची तळमळ कळली

आँनलाईनमधे मुले बावरली

चिमणी बालके संगणकापुढे आली

नवनवीन तंत्रे उदयाला आली


संकटात अडकलो तरी मोडला नाही कणा

एकमेकां सहाय्याला नव्हत्या उणीवा

निसर्गापुढे मानवाची झाली वानवा

व्यर्थ गर्व उतरवून शहाणे केलेस मानवा


 मनुष्यहानीत अनेक घरे उध्वस्त झाली

न भरुन येणारी अपार हानी झाली

निसर्गाचे हे चक्र तुझी ना चूक झाली

फुली मात्र लोकांनी तुझ्यावर मारली


सुख दुःखात एकमेकांना जाणावे

छृभुकेल्याला दोन घास अन्न द्यावे

वेळवखत जाणून सेवाधर्मास जाणावे

जीव वाचवण्याचे महान कार्य करावे


इतकी महान शिकवण दिलीस आम्हांला

संकटातून उठायचे शिकवलेस आम्हांला

नाही रे कृतघ्न व्हायचे आम्हांला

सरत्या वर्षा मानाने निरोप देतो तुजला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract