सृष्टी
सृष्टी
सृष्टी नवचैतन्याने सजली
हिरव्या पालवीने मोहरली
रंग गंधित सुमने फुलली
शीतल झुळकीने सुखावली
वसंताचे झाले आगमन
कोकिळ करे गोड कूजन
सोनचाफा बहावा फुलला
लाल गुलमोहराचे नर्तन
चैत्रगौर सजली नटली
विविध पदार्थे तृप्त झाली
पन्हे घेता मनी सुखावली
सुंदर आराशीने भारावली
सृष्टीमाता मनी प्रसन्न झाली
शुभ आशिर्वच देऊ लागली
पर्यावरणावरी लक्ष राहू दे
दीर्घ आयुरारोग्य लाभू दे
