स्पर्धेतील आव्हान
स्पर्धेतील आव्हान
नको भटकू देवू
मनाचे ध्यान
खूप मोठं आहे
स्पर्धेतील आव्हान
क्षमतेच्या कसोटीवर
मोठी आहे स्पर्धा
नको पाऊल टाकू
जेव्हा ज्ञान असेल अर्धा
स्पर्धेत टिकण्यासाठी
पूर्ण हवी मेहनत
काही मिळविण्यासाठी
मोजावी लागते किंमत
हिंमत न हारता
करत जा कर्म
स्पर्धेच्या कसोटीवर
कळेल मर्म
एकाहून एक सरस
इथं पीक आहे गुणांचा
एक एक वस्तूसाठी
लोंढा वाहतो जनांचा
जिंकण्यासाठी तुला
लढा द्यावं लागेल प्रखर
थांबू नका कुठे
खूप उंच आहे शिखर
