सोनसळी पैलतीर
सोनसळी पैलतीर
होऊ नको सखे दुःखी
आता उरलो दोघेच
सारीपाट आयुष्याचा
डाव खेळूया इथेच
नको रुसवे फुगवे
प्रेमभ-या गुजगोष्टी
दारी ये कांचनसंध्या
जाऊ स्वागतास जोडी
नातीगोती विरलीशी
नको जुन्या आठवणी
नव्या सोनपटावरी
मधुरशा गुजगोष्टी
पैलतीर लांबवर
आता दृगोचर असे
प्रीती तराण्यांची मजा
लुटू दोघे मोदभरे
सोनसळी पैलतीर
स्थिती उत्पत्ती नि लय
सृष्टीचक्र स्विकारले
आता न कसले भय
आनंदाचे धाम सखे
आता हात हाती घेऊ
आनंदाने नाचू गाऊ
प्रेमसागरात रमू
